महत्त्वाची बातमी! 12 एप्रिलला मुंबई-गोवा हायवेवर जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी

रायगड किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 345व्या पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 

Image credit: Canva

या कार्यक्रमासाठी नागरिक हे आपापली वाहने घेऊन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 

Image credit: Canva

या काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

Image credit: Canva

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यत जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आलीय.

Image credit: Canva

मध्यरात्री 12.01 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत अवजड वाहनांना वाहतूक बंदी असेल अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही माहिती दिलीय. 

Image credit: Canva

दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहने, पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका यांना ही बंदी लागू नाहीय. 

Image credit: Canva

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील 12 एप्रिलला रायगडाच्या दौऱ्यावर आहेत. 

Image credit: PTI

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Image credit: IANS

आणखी वाचा

पुणे हादरले! आईनेच 2 महिन्यांच्या जुळ्या मुलांना फेकले पाण्याच्या टाकीत

marathi.ndtv.com