पुणे हादरले! आईनेच 2 महिन्यांच्या जुळ्या मुलांना फेकले पाण्याच्या टाकीत

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एका महिलेने तिच्या दोन महिन्यांच्या मुलांना पाण्याच्या टाकीत ढकलल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: Canva

मुलं सतत आजारी पडतात म्हणून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. यानंतर तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला.

 प्रतिभा मोहितेला (वय 35 वर्षे) या प्रकरणी अटक करण्यात आलीय. 

Image credit: Canva
Image credit: Canva

2014मध्ये प्रतिभाचे लग्न झालं पण 10 वर्षे होऊनही मुलं होत नव्हती.

Image credit: Canva

मुलं व्हावीत म्हणून तिने टेस्ट ट्युब बेबी ट्रीटमेंट घेतली. याद्वारे तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. 

Image credit: Canva

पण या मुलांची वाढ व्यवस्थित होत नव्हती, मुलं वारंवार आजारी पडत होते; अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Image credit: Canva

या सर्व गोष्टींमुळे प्रतिभा मोहितेला मानसिक ताण जाणवू लागला. 

Image credit: Canva

मानसिक तणावापोटी तिने मुलांना पाण्याच्या टाकीत टाकले, या घटनेत मुलांचा मृत्यू झाला.

Image credit: Canva

प्रतिभाने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, पण ती बचावली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडालीय.

आणखी वाचा

गर्भवतीला 3-4 जणांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, वादाला कारण दुसरी बाई?

marathi.ndtv.com