हिमाचल प्रदेशातील ढगफुटीनंतरची भयानक परिस्थिती, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात बुधवारी (25 जून) आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पाच्या परिसराचे मोठे नुकसान झाले.
Image credit: PTI इंदिरा प्रियदर्शिनी जलविद्युत प्रकल्पाजवळील कामगार वसाहतीतील सुमारे 15-20 कामगार पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जातेय.
Image credit: PTI पुरामुळे प्रभावित झालेल्या या परिसरात एकूण चार मृतदेह सापडल्याची माहिती अतिरिक्त उपदंडाधिकारी शिल्पा बेक्टा यांनी दिलीय.
Image credit: PTI कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात बुधवारी ढगफुटीमुळे पूर आला, यानंतर बेपत्ता झालेल्या सात जणांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.
Image credit: PTI घटनास्थळावर एनडीआरएफ, एसडीआरएफस, पोलीस, होमगार्ड यांचे बचावकार्य आणि शोध मोहीम सुरू आहे.
Image credit: PTI दुर्गम भाग आणि खराब हवामानामुळे शोधकार्यामध्ये अडथळे येत आहेत.
Image credit: PTI अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेले काही लोक हिमाचल प्रदेशातील नुरपूर आणि चंबा क्षेत्रातील तसेच उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.
Image credit: PTI भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील या नैसर्गिक आपत्तीवर शोक व्यक्त केलाय.
Image credit: PTI भाजप आमदार सुधीर शर्मा यांनी गुरुवारी (26 जून) घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रवाहाजवळ मजुरांसाठी शेड बांधणे हा निष्काळजीपणा आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे, असे आमदार शर्मा यांनी म्हटलंय.
Image credit: PTI आणखी वाचा
जय हिंद... Axiom-4 मिशनवर जाताना शुभांशू शुक्लांनी पहिल्या मेसेजमध्ये काय म्हटले?
marathi.ndtv.com