Mandi Cloudburst Photos: ढगफुटी, पूर, भूस्खलन... जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI हिमाचल प्रदेशातील मंडी शहरामध्ये सोमवारी (30 जून) ढगफुटी झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झालीय.
Image credit: PTI ढगफुटीनंतर येथे पूर आला आणि काही ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत.
Image credit: PTI करसोग आणि धर्मपूर परिसरात ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झालंय.
Image credit: PTI करसोग येथे पुरामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर गोहर परिसरातील सात जण बेपत्ता आहेत.
Image credit: PTI पुरामुळे कित्येक गाड्यांचे आणि घरांचंही प्रचंड नुकसान झालंय.
Image credit: PTI करसोगचे DCP तरनजीत सिंह यांच्या माहितीनुसार, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 25हून अधिक लोकांना वाचवण्यात आलंय.
Image credit: PTI मुसळधार पावसामुळे मंडी शहरातील पंडोह बाजारात पाणी साचलंय. येथून रात्री लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय.
Image credit: PTI बियास नदीला पूर आल्याने पाणी मंडी शहरातील पंचवक्त्र मंदिरापर्यंत पोहोचले आहे.
Image credit: PTI मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालंय.
Image credit: PTI बाखली आणि कुकला पूल कोसळल्यामुळे अनेक भागांशी संपर्क तुटलाय.
Image credit: PTI चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
आणखी वाचा
जगन्नाथ रथयात्रेमध्ये अदाणी समूहातर्फे 'प्रसाद सेवा'
marathi.ndtv.com