हिना खानने स्वतःच कापले स्वतःचे केस, आईला अश्रू अनावर

Edited by Harshada J S Image credit: Hina Khan Instagram
04/07/2024

टीव्ही अभिनेत्री हिना खानने आपल्या सोशल मीडियावर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

व्हिडीओमध्ये ती स्वतःचे केस कापताना दिसतेय. यावेळेस तिच्या आईला रडू आवरत नव्हते.

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

हिनाने केस कापण्याचे हे कठीण पाऊल तिला झालेल्या आजारामुळे उचलले आहे. 

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

हिना खान ब्रेस्ट कॅन्सरविरोधात लढा देतेय आणि सध्या तिची केमोथेरपी सुरू आहे.

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

केमोथेरपीदरम्यान शरीरावरील सर्व केस गळतात. डोक्यावरीलच नव्हे तर आयब्रो, हात-पाय संपूर्ण शरीरावरीलच केस गळतात. 

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

 थेरपीमुळे केस गळण्यापूर्वीच हिनाने केस कापण्याचा निर्णय घेतला. 

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

कापलेल्या केसांचा ती विग तयार करणार आहे आणि ट्रीटमेंटदरम्यान हाच विग वापरणार असल्याचे तिनं सांगितले.

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

ब्रेस्ट कॅन्सर झालेला असतानाही हिना आपल्या कामाला प्राधान्य देताना दिसत आहे. 

04/07/2024 Image credit: Hina Khan Instagram

आणखी वाचा

पती राघवपेक्षा परिणितीचे 'या' गोष्टीवर आहे जास्त प्रेम

marathi.ndtv.com