'हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तर...' आर. अश्विनचे वादग्रस्त विधान
Edited by Harshada J S Image credit: R Ashwin Insta
माजी क्रिकेटपटू आर. अश्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Image credit: R Ashwin Insta
व्हायरल व्हिडीओमध्ये अश्विनने हिंदी भाषेवरून वादग्रस्त विधान केले आहे.
Image credit: R Ashwin Insta
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर राज भाषा आहे, अश्विनच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय.
Image credit: R Ashwin Insta
एका खासगी कॉलेजच्या दीक्षांत समारंभामध्ये अश्विन गुरुवारी (9 जानेवारी) सहभागी झाला होता.
Image credit: R Ashwin Insta
यावेळेस त्याने विद्यार्थ्यांना विचारले की, त्यांना कोणत्या भाषेमध्ये संवाद साधायला आवडेल.
Image credit: R Ashwin Insta
यावेळेस काहींनी इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले. तर त्याने तमिळमध्ये संवाद साधण्याबाबत विचारले असता त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Image credit: R Ashwin Insta
पण हिंदी भाषेमध्ये संवाद साधण्यास कोणीही तयारी दर्शवली नाही.
Image credit: R Ashwin Insta
'हिंदी... कोणतीही प्रतिक्रिया नाही. हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही तर राज भाषा आहे, असे माझं म्हणणंय', असे विधान अश्विनने केले.
Image credit: R Ashwin Insta
अश्विनच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Image credit: PTI आणखी वाचा
चहलने धनश्री वर्मासोबतच्या नात्याबाबत दिले मोठे संकेत? इन्स्टा पोस्टमध्ये 'पती' म्हणून उल्लेख टाळला
marathi.ndtv.com