या प्राण्याच्या केसांपासून तयार करण्यात आला होता पहिला टुथब्रश

Edited by Harshada J S Image credit: Canva
27/06/2024

सकाळी उठल्यानंतर आपण सर्वप्रथम दात स्वच्छ करतो. हल्ली दात घासण्यासाठी लोक इलेक्ट्रॉनिकसह वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश वापरतात. पण ब्रशचा शोध कसा लागला? हे माहिती आहे का...

27/06/2024 Image credit: Canva

टुथब्रशचा शोध चीनने लावला. पण त्यापूर्वीही प्राचीन युगात लोक झाडाच्या डहाळी-टुथपिकचाही वापर करत होते.

27/06/2024 Image credit: Canva

26 जून 1498 रोजी चीनने टुथब्रशचा शोध लावला आणि त्यावेळेच्या राजाने याचे मालकी हक्क स्वतःकडे ठेवले. 

27/06/2024 Image credit: Canva

पहिला टुथब्रश डुकराच्या मानेच्या भागात असणाऱ्या मजबूत केसांच्या मदतीने तयार करण्यात आला. 

27/06/2024 Image credit: Canva

ब्रशच्या हँडलसाठी बांबू आणि प्राण्यांच्या हाडांचा वापर करण्यात आला होता. 

27/06/2024 Image credit: Canva

डुकरांच्या केसांपासून तयार केलेल्या ब्रशचा वापर 1938पर्यंत करण्यात आला. 

27/06/2024 Image credit: Canva

ग्रीक-रोमन नागरिक चांदीच्या किंवा पितळेच्या टुथपिकच्या मदतीने दात स्वच्छ करायचे. चीनमध्ये 1223दरम्यान घोड्यांच्या शेपटीच्या केसांपासून तयार केलेल्या ब्रशचाही उल्लेख आहे. 

27/06/2024 Image credit: Canva

कालांतराने प्राण्यांच्या केसांऐवजी नायलॉनच्या ब्रशचा वापर होऊ लागला. पूर्वी यास डॉक्टर वेस्ट मिरेकल टुथब्रश म्हटले जात होते. 

27/06/2024 Image credit: Canva

डिजिटल युगात इलेक्ट्रिक ब्रशचंही उत्पादन वाढले आहे. 

27/06/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

अल्ट्रासाऊंड प्रक्रियेपूर्वी का लावतात चिकट जेल?

marathi.ndtv.com