हॉकी इंडियाने पीआर श्रीजेशचा जर्सी नंबर केला रिटायर

Edited by Harshada J S Image credit: Sreejesh P R Instagram

हॉकी टीमचा अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशने काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली. 

Image credit: Sreejesh P R Instagram

निवृतीपूर्वी पीआर श्रीजेश आणि टीमने देशासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करून ब्राँझ मेडल जिंकले.

Image credit: Sreejesh P R Instagram

हॉकी खेळातील योगदान पाहता हॉकी इंडियाने पीआर श्रीजेशसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

Image credit: Sreejesh P R Instagram

क्रिकेटमध्ये जसे सचिन तेंडुलकर, एमएस धोनीचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जर्सी नंबर रियाटर करण्यात आला.

Image credit: Sreejesh P R Instagram

त्याच पद्धतीने हॉकी इंडियानंही पीआर श्रीजेशचा जर्सी क्रमांक 16 रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Image credit: Sreejesh P R Instagram

हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी म्हटले की,'16 क्रमांकाची जर्सी यानंतर कधीही दिसणार नाही. तुमच्यासह जर्सीही रिटायर होईल'.

Image credit: Sreejesh P R Instagram

सिंह पुढे असेही म्हणाले की,'16 क्रमांकाची जर्सी आता नेहमी तुझ्या नावावर राहील. हा आम्हा सर्वांचा निर्णय आहे.

Image credit: Sreejesh P R Instagram

आता सीनिअर टीममधील कोणताही खेळाडू या क्रमांकाची जर्सी परिधान करणार नाही. - भोलानाथ सिंह

Image credit: Sreejesh P R Instagram

आणखी वाचा

नीरज चोप्रा आणि मनु भाकरचे लग्न? नीरजच्या काकांनी अखेर सोडले मौन

marathi.ndtv.com