कमी झोपेमुळे हाडांवर काय परिणाम होतात? तज्ज्ञांनी वर्तवला धोका

Edited by Harshada J S Image credit: Canva

अपुरी झोप किंवा कमी वेळ झोपल्यास कित्येक आजारांचा धोका वाढू शकतो. 

Image credit: Canva

नैराश्य, ताणतणाव, डार्क सर्कल, थकवा, एकाग्रतेतील अडथळे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

पण कमी झोपेमुळे हाडांवर काय परिणाम होऊ शकतात? हे तुम्हाला माहिती आहे का...

Image credit: Canva

न्युट्रिशनिस्ट डॉ. प्रीती सेठ यांनी कमी झोपेमुळे हाडांवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती सांगितलीय.

Image credit: Canva

डॉ. सेठ यांच्यानुसार, अपुऱ्या झोपेमुळे मानसिक आरोग्यासह हाडांच्या ताकदीवरही परिणाम होतो.

Image credit: Canva

कारण झोपेमध्ये असतानाही शरीरामध्ये कित्येक महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडतात. ज्यापैकी एक आहे कॅल्शिअम मेटाबॉलिझमचे नियमन. 

Image credit: Canva

अपुऱ्या झोपेमुळ शरीर कॅल्शिअम योग्यरित्या शोषूण घेऊ शकत नाही. ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. 

Image credit: Canva

संशोधनातील माहितीनुसार अपुऱ्या झोपेमुळे हाडांशी संबंधित हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो. यामुळे हाडांमधील घनता-ताकदीवर दुष्परिणाम होतात.

Image credit: Canva

झोपेमध्ये असताना आपले शरीर दिवसभरात झालेली झीज भरून काढत असते आणि यावेळेस नव्या पेशींचीही निर्मिती होते. 

Image credit: Canva

पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्यास शरीराच्या या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. 

Image credit: Canva

ज्यामुळे ऑस्टोयोपोरोसिस विकार आणि हाडांचे तुटणे यासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

महिलांसाठी वरदान ठरेल 'हे' इवलेसे फळ

marathi.ndtv.com