तुमच्या आधारकार्डचा गैरवापर होतोय? अशा पद्धतीने तपासा
Edited by Harshada J S Image credit: Canva
आधार कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर केला जातो.
Image credit: Canva
बँकेतून रक्कम काढण्यासह ते कित्येक महत्त्वपूर्ण कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो.
Image credit: Canva
आधार कार्ड नसेल तर तुमच्या कित्येक महत्त्वपूर्ण कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.
Image credit: Canva
पण आधार कार्डचा गैरवापर होतोय, अशी शंका तुम्हाला येत असल्यास सहजसोप्या पद्धतीने घरीबसल्याच याबाबत पडताळणी करू शकता.
Image credit: Canva
UIDAIच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Image credit: Canva
वेबसाइटवर तुम्हाला आधार सर्व्हिसेज पर्यायाच्या खाली आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्रीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
Image credit: Canva
येथे आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड सबमिट करा. यानंतर ओटीपी नंबर सबमिट करा आणि क्लिक करा.
Image credit: Canva
यानंतर ऑथेंटिकेशन टाइप, डेट रेंज आणि ओटीपीसह विचारण्यात आलेली सर्व माहिती शेअर करावी.
Image credit: Canva
व्हेरिफाईड OTPवर क्लिक करताच स्क्रीनवर एक यादी येईल, ज्यामध्ये 6 महिन्यांत आधार कार्डचा वापर कधी व केव्हा करण्यात आला? याची माहिती मिळेल.
Image credit: Canva आणखी वाचा
सरसंघचालक मोहन भागवतांना ASL सुरक्षाकवच, दिवसाचा खर्च किती?
marathi.ndtv.com