घरच्या घरी चांदीचे पैजण चमकवण्याचे 3 सोपे उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

बहुतांश महिलांना चांदीचे पैजण घालण्याची हौस असते. पैजण म्हणजे महिलांच्या श्रृंगाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. 

Image credit: Canva

कालांतराने चांदीचे दागिने काळे पडतात आणि मग त्यावरील चमक पुन्हा आणण्यासाठी लोक सोनाराकडे जातात. 

Image credit: Canva

घरच्या घरी चांदीचे दागिने चमकवण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊया...

Image credit: Canva

चांदीचे पैजण चमकवण्यासाठी वाटीभर गरम पाणी घ्या, त्यामध्ये तीन चमचे मीठ मिक्स करा. 

Image credit: Canva

पाण्यामध्ये लिंबाचा रसही मिक्स करा आणि त्यात पैजण ठेवा. थोड्या वेळाने चांदीचे दागिने चमकतील.

Image credit: Canva

अ‍ॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीनेही पैजण स्वच्छ करू शकता. 

Image credit: Canva

अ‍ॅल्युमिनियम फॉइलसह डिटर्जंटच्या उकळत्या पाण्यात पैजण ठेवा. दागिन्यावरील काळपट दूर होईल.

Image credit: Canva

व्हिनेगरनेही चांदीच्या पैजणावरील चमक पुन्हा येऊ शकते. गरम पाण्यात 3 चमचे व्हिनेगर आणि 2 चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. 

Image credit: Canva

या पाण्यामध्ये 2-3 तास पैजण ठेवून द्या. यानंतर थंड पाण्याने दागिना पुन्हा धुऊन घ्यावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 ताक तयार करण्याच्या 5 आरोग्यवर्धक पद्धती

marathi.ndtv.com