डार्क सर्कलपासून हवीय मुक्तता?
करा हे नैसर्गिक उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हल्ली बहुतांश लोक डार्क सर्कलच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.

Image credit: Canva

ताणतणाव, अपुरी झोप, डिहायड्रेशन किंवा जोर देऊन डोळे रगडल्यास डार्क सर्कलची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडीचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

कोरफडीचा कसा करायचा वापर? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

डोळ्यांखाली केवळ कोरफडीचा गर लावल्यासही डार्क सर्कलची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

कोरफड आणि बटाट्याचा रस एकत्रित करून डोळ्यांखाली 15 मिनिटांसाठी लावा. सलग काही दिवस हा उपाय केल्यास त्वचा सतेज होईल.

Image credit: Canva

कोरफड आणि गुलाब पाणी एकत्रित लावल्यास डार्क सर्कल कमी होतील तसेच कोरड्या त्वचेची समस्याही दूर होईल. 

Image credit: Canva

कोरफड-मधाचे पॅक 15-20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा, यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होतील.

Image credit: Canva

हळदीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत. अर्धा चमचा हळद आणि कोरफडीचा गर एकत्रित करून लावल्यास डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नैसर्गिक आणि बनावट बदामांमधील फरक कसा ओळखावा?

marathi.ndtv.com