...तर स्वर्गीय वडिलांना आनंद झाला असता, DCM अजित पवारांचे वैभवी देशमुखसाठी भावुक पत्र

Edited by Harshada J S Image credit: DCM Ajit Pawar Insta
Image credit: Mosin Shaikh 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीला इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये 85.33% गुण मिळाले.

Image credit: Mosin Shaikh 

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वैभवीने परीक्षेमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. 

Image credit: DCM Ajit Pawar Insta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैभवी देशमुखचे पत्र लिहून कौतुक केले आहे. 

Image credit: DCM Ajit Pawar Insta

विज्ञान शाखेत 85.33%  गुण मिळवून तू उत्तीर्ण झाल्याचे समजून माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे: DCM पवार

Image credit: Mosin Shaikh 

तुझ्या यशातून राज्यातील इतर विद्यार्थ्यांना लढण्याची, यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे: DCM पवार

Image credit: PTI

तुझ्या यशानं वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना खूप आनंद झाला असता,ते आपल्यासोबत नसले तरी तितकाच आनंद महाराष्ट्र आज अनुभवत आहे: DCM पवार

Image credit: DCM Ajit Pawar X

तुझ्या कष्टांना,जिद्दीला सलाम. यापुढेही शैक्षणिक कारकिर्दीत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला असंच यश मिळत राहो: DCM पवार

Image credit: Mosin Shaikh 

आम्ही सर्व कायमच तुझ्यासोबत आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैभवीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credit:  Supriya Sule Insta

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपुमख्यमंत्री एकनाथ शिंदे, राशप खासदार सुप्रिया सुळेंसह अन्य राजकारण्यांनीही वैभवीला फोन करुन तिचे कौतुक केले.

आणखी वाचा

'आनंद हिरावून घेतला, न्यायच हवाय...' सुप्रिया सुळेंसोबत बोलताना वैभवी भावुक

marathi.ndtv.com