Rain Alert: पावसाचा रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्टचा नेमका अर्थ काय

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

रेड अलर्ट म्हणजे हवामानाचा गंभीर इशारा. यामध्ये 24 तासांत 204 मिमी पेक्षा जास्त अतिवृष्टीचा इशारा वर्तवला जातो.

Image credit: PTI

पावसाच्या रेड अलर्टमुळे जीवित तसेच मालमत्तेस मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते. 

Image credit: PTI

ऑरेंज अलर्ट म्हणजे 24 तासांत 115 ते 204 मीमीपर्यंत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते. 

Image credit: PTI

ऑरेंज अलर्टनुसार सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्यासह घराबाहेर न जाण्याचे आवाहन केले जाते. 

Image credit: PTI

यलो अलर्ट म्हणजे 65 ते 115 मीमी पावसाचा इशारा. हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. 

Image credit: PTI

ग्रीन अलर्ट म्हणजे 65 मीमीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. म्हणजे कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता नसते. 

तुमच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यास सतर्क राहा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. 

Image credit: PTI

आणखी वाचा

जेवल्यानंतर वज्रासनामध्ये बसण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com