India Vs Bangladesh Test: सामना एक, विक्रम अनेक
Image credit: ANI
Edited by Shreerang Khare
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कानपूर येथे कसोटी सामना सुरू आहे.
Image credit: IANS
सामन्याचे दोन दिवस पावसामुळे वाया गेले होते. पण चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पडला.
Image credit: ANI
भारताने 50,100,150,200 आणि 250 धावा वेगाने करण्याचा विक्रम केला.
Image credit: ANI
भारताने 3 ओव्हरमध्ये 50 धावा केल्या, यापूर्वी इंग्लंडने 4.2 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजविरोधात 50 धावा केल्या होत्या.
Image credit: ANI
तर भारताने वेस्ट इंडिजविरोधात 12.2 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या होत्या. बांगलादेशविरोधात भारताने 10.1 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या.
Image credit: ANI
वेगवान 150 धावांचा स्वतःचाच विक्रम भारताने मोडीत काढला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीमध्ये भारताने 18.2 ओव्हरमध्ये 150 धावा केल्या.
Image credit: ANI
वेगवान 200 धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. 24.2 ओव्हरमध्ये भारताने 200 धावा करत हा विक्रम मोडला.
Image credit: ANI
वेगवान 250 धावांचा इंग्लंडचा विक्रम भारताने मोडला. भारताने 30.1 ओव्हरमध्ये 250 धावा केल्या.
Image credit: ANI
कसोटी सामन्यात पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्स मारणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरलाय.
Image credit: ANI
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा पार करून सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडलाय.
Image credit: ANI
रवींद्र जाडेजाने कसोटी सामन्यात 300 विकेटचा टप्पा पार केला.
Image credit: ANI
आणखी वाचा
सर्वात फिट क्रिकेटर कोण? कोहली-धोनी नव्हे तर जसप्रीत बुमराह म्हणाला...
marathi.ndtv.com