पीआर श्रीजेश कसा बनला भारतीय हॉकी टीमची वॉल?

Edited by Harshada  J S Image credit: IANS
09/08/2024
Image credit: PTI

पीआर श्रीजेश हा मूळचा केरळ राज्यातील रहिवासी आहे. 

09/08/2024
Image credit: PTI

शाळेत असल्यापासून त्याला विविध खेळांची प्रचंड आवड होती. धावणे, व्हॉलीबॉल, उंच उडी मारणे यासारख्या खेळांमध्ये त्याने सहभाग नोंदवलाय.

09/08/2024
Image credit: PTI

श्रीजेशमधील क्रीडा कौशल्य पाहून शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी त्याला हॉकी खेळाचा सल्ला दिला. 

09/08/2024

2004 साली श्रीजेशने ज्युनिअर इंटरनॅशनल हॉकी स्पर्धेत पदार्पण केले. ही स्पर्धा त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. काही महिन्यांतच त्याला सिनिअर हॉकी संघामध्ये संधी मिळाली.

09/08/2024 Image credit: PTI
Image credit: IANS

सिनिअर हॉकी संघात जागा मिळाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने स्पर्धा समजली. काही सामन्यांत श्रीजेशचा खेळ खालावला. ज्यामुळे बदली खेळाडू म्हणून निवड होऊ लागली. 

09/08/2024 Image credit: PTI
Image credit: IANS

अनेकदा प्रतिस्पर्ध्यांचे गोल अडवण्यात श्रीजेश असमर्थ ठरला, ज्यामुळे श्रीजेशवर संघातील स्थान गमावण्याची वेळ आली.

09/08/2024
Image credit: ANI

2011मध्ये एशियन चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीजेशने पेनल्टी स्ट्रोकचा बचाव केला. यामुळे तो चर्चेत आला.

09/08/2024
Image credit: ANI

2013 साली झालेल्या आशिया कप स्पर्धेमध्ये श्रीजेशला बेस्ट गोलकिपर अवॉर्डने गौरवण्यात आले. 

09/08/2024
Image credit: ANI

2014 साली झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला. पण श्रीजेशने आपल्या गोलकिपिंग स्किल्सने सर्वांनाच प्रभावित केले. 

09/08/2024
Image credit: IANS

336 सामन्यांचा अनुभव असलेल्या श्रीजेशच्या नावावर 2 ऑलिम्पिक स्पर्धांचे कांस्य पदक, 2 आशियाई क्रीडा स्पर्धांचे सुवर्ण पदक, 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे रौप्य पदक जमा आहेत.

09/08/2024

आणखी वाचा

'आई कुस्ती जिंकली, मी हरले...' विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

marathi.ndtv.com