'तू चॅम्पियन आहेस...' विनेश फोगाटच्या समर्थनार्थ बॉलिवूडकरांची पोस्ट

Edited by Harshada J S Image credit: IANS

पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर बॉलिवूडकरांनी तिच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली.

Image credit: PTI

बॉलिवूडकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आणि विनेशला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. 

Image credit: ANI

आलिया भटने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, विनेश फोगाट तू देशासाठी एक प्रेरणा आहेस. कोणतीही गोष्ट तुमची हिंमत हिरावून घेऊ शकत नाही. 

Image credit: Alia Bhatt Instagram

आज तुझं हृदय दुखावले गेलंय. इतकंच सांगायचंय की तुझ्यासह आम्हीही दुःखी आहोत. तुझ्यासारखे कोणीही नाहीय विनेश फोगाट - आलिया

Image credit: Alia Bhatt Instagram

ही हृदयद्रावक बातमी आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर विनेश फोगाटने गोल्ड पलिकडेही स्वतःची ओळख निर्माण केलीय - तापसी पन्नू

Image credit: Taapsee Pannu Instagram

 तुला आता कसे वाटत असेल याची कल्पना करू शकत नाही व आता काय बोलावे हे कळत नाहीय. तू चॅम्पियन होती व कायम राहशील - सोनाक्षी सिन्हा

Image credit: Sonakshi Sinha Instagram

या 100 ग्रॅम जास्त वजनाच्या कथेवर कोणकोणाला विश्वास होतोय? - स्वरा भास्कर

Image credit: Swara Bhasker Instagram 

आम्हा सर्वांना तुझ्यावर व तू खेळासाठी जे काही केले, त्याचा अभिमान आहे. तू लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेस - फरहान अख्तर 

Image credit: Farhan Akhtar Instagram

आणखी वाचा

'आई कुस्ती जिंकली, मी हरले...' विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

marathi.ndtv.com