केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Image credit: ANI
संपूर्ण बजेट समजून घेण्यासाठी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Image credit: ANI
देशाचे पहिले बजेट 7 एप्रिल 1860मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतर्फे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी सादर केले होते.
Image credit: Canva
स्वातंत्र्यानंतरचे पहिले बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर.के.शनमुखम चेट्टी यांनी सादर केले होते.
Image credit: Canva
माजी केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक म्हणजे 10 वेळा संसदेत बजेट सादर केले आहे.
Image credit: Gujarat History X
देशाच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री होण्याचा मान निर्मला सीतारमण यांना मिळाला.
Image credit: ANI
बजेटदरम्यान सर्वात मोठे भाषण देण्याचे रेकॉर्डही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावे आहे. वर्ष 2020मध्ये त्यांनी 2 तास 42 मिनिटांपर्यंत भाषण केले होते.
Image credit: ANI
1977 साली तत्कालीन अर्थमंत्री हीरूभाई मुलजीभाई पटेल यांनी केवळ 800 शब्दांमध्ये बजेट सादर केले होते.
Image credit: Canva
पूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री रेल्वेचे बजेट स्वतंत्र सादर करत असत, पण 2017 पासून एकत्रितच बजेट सादर केला जात आहे.
Image credit: Canva
1955 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प केवळ इंग्रजी भाषेमध्ये छापला जात असे,पण यानंतर काँग्रेस सरकारने इंग्रजीसह हिंदी भाषेतही अर्थसंकल्प छापण्यास सुरुवात केली.
Image credit: ANI
कोव्हिड महामारीदरम्यान पेपरचा वापर टाळण्यात आला. 2021-22साठी पहिले पेपरलेस बजेट सादर करण्यात आले.
Image credit: ANI
पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री ब्रीफकेस घेऊन संसदेत पोहोचत होते, पण आता टॅबलेट घेऊन संसदेत दाखल होतात.
Image credit: ANI
आणखी वाचा
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुप्त ठिकाणी का ठेवले जाते?