अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुप्त ठिकाणी का ठेवले जाते?
Edited by Harshada J S Image credit: ANI केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Image credit: ANI बजेटमुळे काय महागणार, काय स्वस्त होणार व कोणकोणत्या गोष्टींमुळे जीवनशैलीवर परिणाम होणार? याबाबत माहिती मिळते.
Image credit: ANI अर्थसंकल्प अतिशय गोपनीय पद्धतीने तयार केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे का?
Image credit: Canva कित्येक महिन्यांच्या मेहनतीनंतर संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करतात. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अतिशय गोपनीय असते.
Image credit: ANI सर्वसाधारण अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना 7 दिवसांसाठी एका गुप्त जागी पाठवले जाते. या अधिकाऱ्यांचे नाव जाहीर केले जात नाही.
Image credit: Canva अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्येच एका गुप्त जागी पाठवले जाते.
Image credit: Canva अधिकाऱ्यांना मोबाइल वापरण्याची व आपल्या कुटुंबीयांशीही संवाद साधण्याची परवानगी नसते.
Image credit: Canva इंटरनेट नसलेल्या प्रिटिंग रुममध्ये केवळ एक इनकमिंग सुविधा असणारा फोन उपलब्ध करून दिला जातो.
Image credit: Canva अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी बोलायचे असल्यास त्यांच्यासोबत गुप्तचर विभागातील एक अधिकारीही हजर असतो आणि फोन टॅप केला जातो.
Image credit: Canva सात दिवसांत या गुप्त खोलीमध्ये डॉक्टरांचे पथकही तैनात असते. इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाचीही तपासणी केली जाते.
Image credit: Canva सर्वत्र CCTV कॅमेरे असतात व केंद्रीय मंत्री संसदमध्ये बजेट सादर करतात, त्यावेळेस अधिकाऱ्यांना गुप्त ठिकाणाहून घर जाण्याची परवानगी दिली जाते.
Image credit: Canva आणखी वाचा
पीएम आवास योजनेसाठी मिळालेल्या पैशांमुळे संसार उद्ध्वस्त
marathi.ndtv.com