Women Security: महिलांच्या सुरक्षेसाठी हे काम कराच, अन्यथा कार्यालयांना बसणार 50,000 रुपयांचा दंड

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

महिलांवरील अत्याचार, गुन्हे रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवल्या जातात. 

Image credit: Canva

याचसंदर्भातील आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. 

Image credit: Canva

महिलांच्या सुरक्षेसाठी शासकीय किंवा खासगी कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Image credit: Canva

अंतर्गत तक्रार समिती स्थापन न करणाऱ्यांना कार्यालयांना 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. 

Image credit: Canva

कायद्यातील आणि नियमातील तरतुदीचे तसेच जबाबदारीचे पालन न केल्यास परवाना रद्द करण्यात येऊन दुप्पट दंड आकारण्यात येईल.

Image credit: Canva

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय धनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिलीय.

Image credit: Canva

शासकीय किंवा खासगी आस्थापनात 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी/कर्मचारी कार्यरत असल्यास महिलांसाठी ही समिती स्थापन होणे अनिवार्य आहे.

Image credit: Canva

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनी ही समिती स्थापन करुन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (वांद्रे) सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. 

आणखी वाचा

पिंक ई रिक्षा योजनेसाठी सरकारकडून मिळणार इतके हजारो रुपये

marathi.ndtv.com