International Tea Day जगातील प्रसिद्ध चहा, तुम्ही घेतला आहे का आस्वाद?

Edited by Harshada J S Image credit: Canva
21/05/2024

पाण्यानंतर जास्त प्रमाणात प्यायला जाणारा द्रवपदार्थ म्हणजे चहा. आंतरराष्ट्रीय चहा दिवस दरवर्षी 21 मे रोजी साजरा केला जातो. 

Image credit: Canva
21/05/2024

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, या दिवसाच्या निमित्ताने चहाचा सांस्कृतिक वारसा, आरोग्यदायी फायदे व आर्थिक महत्त्व साजरे केले जाते. 

21/05/2024 Image credit: Canva

चहाचे किती प्रकार आहेत आणि या चहांची चव कशी असते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

21/05/2024 Image credit: Canva

खास पद्धतीने पिकवलेली व प्रोसेस्ड ग्रीन टीच्या पानांची वाटलेली पूड म्हणजे माचा टी. याचे उत्पादन चीन देशामध्ये करण्यात येते. 

21/05/2024 Image credit: Canva

तेह तारिक हा दुधाचा गोड व फेसाळलेला मलेशियाई चहा. या चहाच्या रेसिपीमध्ये कपच्या टोकापर्यंत व बाहेर देखील असतो. चहा सर्व्ह करण्याची ही अनोखी पद्धत आहे.

21/05/2024 Image credit: Canva

चा येन एक प्रसिद्ध थाय आइस्ड चहा आहे. नारळाच्या दुधाचा वापर करूनही आपण हा चहा तयार करू शकता. यामध्ये बर्फाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

21/05/2024 Image credit: Canva

भारतीयांच्या या आवडत्या पेयाचा बिस्किट, ब्रेड किंवा भज्यांसोबत आस्वाद घेतला जातो. भारतामध्ये मसाला चहा प्रसिद्ध आहे. 

21/05/2024 Image credit: Canva

सीलोन हे श्रीलंका देशाचे पूर्वीचे नाव आहे. जे चहाच्या व्यवसायात आजही वापरले जाते. या चहाचा आस्वाद आइस्ड टी किंवा हॉट ब्लॅक टीच्या स्वरुपातही घेऊ शकता. 

21/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

हे पिवळे पाणी प्यायल्यास मिळतील अगणित लाभ

marathi.ndtv.com