विनेश फोगाटची आता निवडणुकीच्या रिंगणात दंगल,काँग्रेस आज घेणार निर्णय? 

Edited by Harshada J S Image credit: PTI

कुस्तीपटू विनेश फोगाट काँग्रेसच्या तिकिटावर हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. 

Image credit: ANI

चर्चादरम्यान काँग्रेसने म्हटलंय की मंगळवारी (3 सप्टेंबर) विनेश फोगाटसंदर्भातील निर्णय स्पष्ट करण्यात येणार आहे. 

Image credit: PTI

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 30 उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

Image credit: PTI

दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर विनेश फोगाटने कुस्तीच्या खेळातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. 

Image credit: IANS

ऑलिम्पिकच्या फायनल मॅचमध्ये विनेशचे अतिरिक्त 50 ग्रॅम वजन आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. 

Image credit: IANS

थोडक्यासाठी मेडल हुकल्याची बाब विनेशच्या प्रचंड जिव्हारी लागली आणि यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली. 

Image credit: PTI

मायदेशी परतल्यानंतर विनेश फोगाट काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

Image credit: ANI

आणखी वाचा

दंगल 2 सिनेमा येतोय... आमिरने विनेश फोगाटला केला VIDEO CALL

marathi.ndtv.com