चोरी ते पोलीस अधिकारी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची कहाणी थक्क करणारी 

Edited by Harshada J S Image credit: ANI

सुशीलकुमार शिंदे यांनी सुसंस्कृत आणि विनम्र मुख्यमंत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

Image credit: PTI

लहानपणी सुशीलकुमार शिंदे हे किरकोळ स्वरुपातील चोरी करायचे आणि त्यांनी आपली गँगही तयार केली होती, असे म्हणतात.

Image credit: PTI

TOIने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे यांनी लहानपणी एका महिलेचा दागिना चोरला होता. 

Image credit: PTI

शिंदेंच्या आईला हे समजले तेव्हा त्यांनी तो दागिना सावकाराकडून विकत घेतला आणि त्या महिलेला पुन्हा द्यायला सांगितले. 

Image credit: PTI

शिंदेंच्या आईने त्यांच्या कानाखालीही मारली होती, ज्यामुळे शिंदेंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली.

Image credit: ANI

शिंदे यांचे बालपण खडतर परिस्थितीत गेले, त्यांनी उदबत्त्या विकल्या तसेच सुरक्षारक्षक म्हणून काम केले.

Image credit: ANI

सुशीलकुमार शिंदेंचे खरे नाव ज्ञानेश्वर आहे पण ते उच्चारणे कठीण ठरत असल्याने त्यांना ग्यानबा नाव ठेवण्यात आले.

Image credit: ANI

शिंदे कॉलेज जीवनात उत्तम अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले, यामुळे मित्रांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

Image credit: ANI

यादरम्यानच त्यांना सुशीलकुमार हे नाव मिळाले. 

Image credit: ANI

सुशीलकुमार शिंदे यांनी कोर्टात पट्टेदार म्हणून काम केले आहे. 

Image credit: ANI

शिंदे नंतर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले आणि त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली.

Image credit: ANI

2012 ते 2014 या काळात त्यांनी देशाचे गृहमंत्रिपदही भूषवले आहे.

Image credit: ANI

सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती आता खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. 

Image credit: PTI

आणखी वाचा

समरजीत घाटगेंची बहीण बॉलिवूडमध्ये आहे मोठी अभिनेत्री, शाहरुखसोबत केलंय काम

marathi.ndtv.com