सप्तश्रृंगी इमारतीत दुरुस्तीचे काम करणाऱ्या घरमालकाला अटक 

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: PTI

कल्याणमधील चिकणीपाडा येथील सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला.

दुर्घटनेप्रकरणी इमारतीत दुरुस्तीचे काम करणाऱ्या घरमालकाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केलीय. 

Image credit: PTI
Image credit: Amjad Khan

कृष्णा चौरसिया असे अटक करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे. 

Image credit: Amjad Khan

चौरसियाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Image credit: Amjad Khan

कृष्णा चौरसियाचे सप्तश्रृंगी इमारतीत चौथ्या मजल्यावर घर आहे, त्याच्याच घरामध्ये स्लॅब दुरुस्तीचे काम सुरू होते. 

Image credit: Amjad Khan

दुरुस्तीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळला आणि थेट तळमजल्यापर्यंत पोहोचला. 

Image credit: Amjad Khan

घटनास्थळावरील काही नमुने गोळा करुन तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Image credit: Amjad Khan

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

Image credit: Amjad Khan

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीय. 

आणखी वाचा

छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ PHOTOS

marathi.ndtv.com