धडा शिकवला पाहिजे... रश्मिका मंदानाला काँग्रेस आमदाराकडून धमकी
Edited by Harshada J S
Image credit: Rashmika Mandanna Insta
Image credit: Rashmika Mandanna Insta
काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी अभिनेत्री रश्मिका मंदानावर टीका केलीय.
बंगळुरूतील चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिल्याने आणि हैदराबादची रहिवासी असल्याचे सांगितल्याने रश्मिकाला त्यांनी टार्गेट केले.
Image credit: Rashmika Mandanna Insta
Image credit: ANI
रश्मिका कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यातील आहे, तिने हैदराबादची रहिवासी असल्याचा दावा केल्याबाबत तिला धडा शिकवला पाहिजे, असे गौडा यांनी म्हटलंय.
रश्मिकाने 'किरिक पार्टी' या कन्नड सिनेमाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली होती, असे गौडा म्हणाले.
Image credit: Rashmika Mandanna Insta
एका चित्रपट महोत्सवाकरिता तिला आमंत्रित करण्यात आले होते, तेव्हा तिने हैदराबादमध्ये राहत असल्याचे सांगितले; असेही गौडांनी म्हटलंय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
कर्नाटक कुठेय, हे माहिती नसल्याचंही रश्मिकाने म्हटले,असा दावाही गौडा यांनी केलाय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
तसेच वेळ नसल्याचे कारण देत तिने चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिल्याचेही गौडांनी सांगितले.
Image credit: Rashmika Mandanna Insta
आमच्या एका आमदाराने रश्मिकाच्या घरी जाऊन तिला चित्रपट महोत्सवाकरिता अनेकदा निमंत्रित केले : रविकुमार गौडा
Image credit: Rashmika Mandanna Insta
कन्नड भूमीतील असतानाही रश्मिकाने कन्नडबाबत खूप आक्षेपार्ह गोष्टी म्हटल्या : रविकुमार गौडा
Image credit: Rashmika Mandanna Insta
तर मग तिला का धडा शिकवला जाऊ नये, असा प्रश्नही रविकुमार गौडांनी उपस्थित केलाय.
Image credit: Rashmika Mandanna Insta
आणखी वाचा
अमृता खानविलकरने गश्मीरला सर्वांसमोर म्हटलं भाऊ, पुढे काय झालं? वाचा
marathi.ndtv.com