सिलिंडरमध्ये किती गॅस क्षिल्लक आहे? जाणून घेण्यासाठी फॉलो करा ट्रिक्स
Edited by Harshada J S Image credit: Canva
हल्ली ग्रामीण भागातही घरगुती सिलिंडरचा वापर केला जातो.
Image credit: Canva
कधीकधी स्वयंपाक करताना सिलिंडरमधील गॅस संपतो. अशातच घरात दुसरा सिलिंडर नसेल त्यावेळेस काही समस्यांचा सामना करावा लागतो.
Image credit: Canva
तर या समस्या टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स आपण जाणून घेऊया. ज्याद्वारे काही मिनिटांत सिलिंडरमध्ये किती गॅस क्षिल्लक आहे, ते समजेल.
Image credit: Canva
सिलिंडरमधील गॅस किती प्रमाणात क्षिल्लक आहे, हे पाहण्यासाठी एका ओल्या कापडाची मदत घ्या.
Image credit: Canva
सिलिंडरवर ओले कापड ठेवा आणि त्यानंतर कापड काढा. ज्या भागावर ओलावा दिसेल. तिथपर्यंत सिलिंडरमध्ये गॅस आहे, हे ओळखा.
Image credit: Canva
सिलिंडरमधील गॅस संपताना ज्वालेचा रंगही बदलतो. ज्वालेचा रंग पिवळसर दिसत असल्यास गॅस संपण्याच्या मार्गावर आहे, हे लक्षात घ्यावे.
Image credit: Canva
गॅस बर्नर खराब झाल्यास किंवा अस्वच्छ असल्यासही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणूनच वेळोवेळी गॅस बर्नर स्वच्छ करावे.
Image credit: Canva
दुसरे म्हणजे सिलिंडर उचलून पाहा, याद्वारे तुम्हाला वजनाचा अंदाज येईल. सिलिंडर हलका जाणवल्यास त्यामध्ये गॅस कमी आहे, हे ओळखावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
विड्याचे पान चावून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com