आंबा फ्रिजमध्ये ठेवावा की ठेवू नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही लोक एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी करतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. 

Image credit: Canva

आंबे फ्रिजमध्ये ठेवावे की ठेवू नये? यावरुन तुमचाही गोंधळ उडत असेल तर जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

आंबे थोडेसे कच्चे असतील तर फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. आंबे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते व्यवस्थित पिकणार नाहीत. 

Image credit: Canva

अर्धे पिकलेले आंबे कायम सामान्य तापमानामध्ये ठेवावे, ज्यामुळे ते व्यवस्थित पिकतील.

Image credit: Canva

बाजारातूनच पिकलेले आंबे आणल्यास ते खाण्यापूर्वी काही तास थंड पाण्यामध्ये ठेवावे. 

Image credit: Canva

पिकलेले आंबे पाच दिवसाकरिता फ्रिजमध्ये ठेवू शकता. त्याहून अधिक दिवस आंबे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते कुजतील. 

Image credit: Canva

सामान्य तापमानात आंबे ठेवल्यास त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स सक्रिय राहतील. 

Image credit: Canva

आंबे फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर अन्य फळ तसेच भाज्यांसोबत ठेवू नका. यामुळे आंब्याची चव बदलू शकते. 

Image credit: Canva

एक ते दोन दिवसांत संपतील तितक्याच प्रमाणात आंबे खरेदी करावे. 

Image credit: Canva

रिपोर्ट्सनुसार आंबे आणि अन्य गुळगुळीत आवरण असणारी फळे सामान्य तापमानामध्ये ठेवावीत. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रोज गुळाचा एक तुकडा खाण्याचे 7 फायदे

marathi.ndtv.com