कोकण हार्टेड गर्लची खास लग्नपत्रिका, कधी करतेय लग्न?

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

संगीतकार कुणाल भगतसोबत अंकिता लग्नगाठ बांधणार आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

लग्नाची पत्रिका अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलीय. पत्रिकेचे डिझाइन अतिशय खास आणि हटके आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

केळीच्या पानाचे डिझाइन असलेल्या पत्रिकेवर अंकिता आणि कुणालचे नाव आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिताने पहिली पत्रिका आणि श्रीफळ कुलदेवतेसमोर ठेवून आशीर्वाद घेतले. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिता - कुणालची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालीय. 

Image credit: Kunal Bhagat Insta

पत्रिकेसह अंकिताने कुणालचा इमोशनल व्हिडीओ देखील इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

व्हिडीओमध्ये कुणाल लग्नाची पत्रिका पाहताना दिसतोय, तर अंकिता त्याला म्हणतेय की, 'अरे किती वेळा पत्रिका पाहशील?'. कुणालचे यावेळेस आनंदाश्रुही अनावर झाले. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

त्यावर अंकिता कुणालला म्हणते की, 'तेव्हा रड यार आता नको रडू नकोस, मला लग्नाच्या वेळेस रडलेला हवा आहेस'.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

दरम्यान अंकिता-कुणालच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

कारण पत्रिकेत तारीख नमूद केलेली नाही. 

आणखी वाचा

साथ सात जन्माची! कौमुदी वलोकरचा शाही विवाहसोहळा

marathi.ndtv.com