अधुरी कहाणी! मालिकेच्या सेटवर जुळलं नाते, लग्नाच्या 9 वर्षांनंतर मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट
Edited by Harshada J S
Image credit: Mugdha Chaphekar Insta
Image credit: Canva
सिनेइंडस्ट्री असो किंवा टेलिव्हिजनचे क्षेत्र जिकडेतिकडे घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे.
Image credit: Mugdha Chaphekar Insta
नुकतेच आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
Image credit: Mugdha Chaphekar Insta
अभिनेत्री मुग्धा चाफेकर आणि अभिनेता रवीश देसाई यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय.
Image credit: Ravish Desai Insta
लग्नाच्या नऊ वर्षांनंतर या जोडप्याने घटस्फोट घेतल्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला.
Image credit: Mugdha Chaphekar Insta
मुग्धा आणि रवीश यांची भेट 'सतरंगी ससुराल' मालिकेच्या सेटवर 2014मध्ये झाली होती.
Image credit: Ravish Desai Insta
मुग्धा आणि रवीश दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर 16 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी लग्न केले.
Image credit: Ravish Desai Insta
खूप विचार केल्यानंतर मुग्धा आणि मी पतीपत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट रवीशने शेअर केलीय.
Image credit: Ravish Desai Insta
तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन रवीशने चाहत्यांना केले.
Image credit: Mugdha Chaphekar Insta
मुग्धा आणि रवीशच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
आणखी वाचा
बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणते, 'मी अंडेही उकडू शकत नाही'
marathi.ndtv.com