मंदिर उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी, दोन महिलांसह 7 जणांचा मृत्यू; 70 पेक्षा अधिक जखमी
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
पणजी शहरापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिरगावामध्ये मोठी दुर्घटना घडली.
Image credit: PTI
शिरगावातील श्री लईराई देवी मंदिरात शनिवारी (3 मे) पहाटेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली.
Image credit: PTI
दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झालाय तर 70 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
Image credit: PTI
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Image credit: PTI
मंदिराच्या वार्षिक उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती, यादरम्यान चेंगराचेंगरीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Image credit: PTI
मंदिर उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी 30,000 ते 40,000 भाविक जमा झाले होते, अशीही माहिती समोर आलीय.
Image credit: PTI
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक मंदिर उत्सवासाठी जमले होते.
Image credit: PTI
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूसही केली.
Image credit: PTI
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्घटनेप्रति शोक व्यक्त केलाय.
आणखी वाचा
PM नरेंद्र मोदींनी विळिंजम बंदराचे केले लोकार्पण PHOTOS
marathi.ndtv.com