महालक्ष्मीची पूजा करताना या 8 महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका, देवीचा मिळेल आशीर्वाद
Edited by Harshada J SImage credit: Canva
दिवा: दिवाळी पूजनामध्ये मातीच्या दिव्याचे अतिशय महत्त्व आहे. पण काहीजण मेणबत्ती किंवा इलेक्ट्रिक दिव्यांचा वापर करतात, असे करणे योग्य नाही.
Image credit: Canva
रांगोळी: सणउत्सव, मंगल प्रसंगी रांगोळी काढल्याने घरात सकारात्मकता निर्माण होते. यामुळे समृद्धीचे द्वार खुले होते, असे म्हणतात.
Image credit: Canva
कवड्या: पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये कवड्यांचेही पूजन करावे.
Image credit: Canva
पूजन केल्यानंतर एक-एक कवडी वेगवेगळ्या लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरी किंवा खिशात ठेवल्यास धनसमृद्धी वाढते, असे म्हणतात.
Image credit: Canva
तांब्याचा शिक्का: सात्त्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता तांब्यामध्ये इतर धातूंपेक्षा अधिक असते.
Image credit: Canva
कलशात तांब्याचा शिक्का टाकल्याने घरात शांती-समृद्धी नांदते, असे म्हणतात.
Image credit: Canva
मंगल कलश: जमिनीवर कुंकूने अष्टदल कमळ आकृती साकारुन त्यावर कलश ठेवा. कलशामध्ये आंब्याची पाने ठेवून श्रीफळही ठेवावे.
Image credit: Canva
कलशावर कुंकूने स्वस्तिक चिन्ह काढावे आणि लाल दोराही बांधावा.
Image credit: Canva
श्रीयंत्र: लक्ष्मी श्रीयंत्र हे धन-वैभवाचे प्रतीक मानले जाते. श्रीयंत्र यश-धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शक्तिशाली यंत्र आहे, असे मानले जाते.
Image credit: Canva
कमळ आणि झेंडूची फुले : कमळ आणि झेंडूचे फुले शांती, समृद्धी आणि मुक्तीचे प्रतीक मानले जाते.
Image credit: Canva
नैवेद्य: लक्ष्मीमातेला नैवद्यात फळे, मिष्टान्न, मेवे आणि पेढ्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त लाह्या, बत्ताशे, चिरंजी, शंकरपाळे, करंजीसह अन्य फराळाचा नैवेद्य अर्पण करावा.
Image credit: Canva
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही.अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Image credit: Canva
आणखी वाचा
दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीमाता-गणपती बाप्पाला अर्पण करा हे नैवेद्य