जुलै महिन्यात बँकांना 12 दिवस सुट्ट्या, महत्त्वाची कामं तातडीने करा पूर्ण 

Edited by Harshada J S Image credit: Canva
30/06/2024

जुलै महिन्यामध्ये देशाभरातील बँकांना 12 दिवस सुट्या असणार आहेत. 

30/06/2024 Image credit: Canva

RBIच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार,4 रविवार व 2 शनिवारसह अन्य 6 दिवस सण-उत्सवानिमित्त बँकांना सुट्ट्या आहेत. 

30/06/2024 Image credit: Canva

7 जुलै, 14 जुलै, 21 जुलै, 28 जुलैला रविवारी तर 13 जुलैला दुसरा शनिवार व 27 जुलैला चौथा शनिवारी असल्याने सुट्ट्या आहेत.

30/06/2024 Image credit: Canva

3 जुलैला बेहदीन खलमनिमित्त शिलाँगमधील तर 6 जुलैला MHIP Dayनिमित्त ऐजोलमधील बँका बंद असतील. 

30/06/2024 Image credit: Canva

8 जुलैला कांग-रथयात्रेनिमित्त इम्फाळमध्ये तर 9 जुलैला दुक्पा त्से जीनिमित्त गंगटोकमधील बँकांना सुट्ट्या आहेत. 

30/06/2024 Image credit: Canva

16 जुलैला हरेलानिमित्त देहरादूनमधील बँका बंद असतील. 

30/06/2024 Image credit: Canva

17 जुलैला मोहरमनिमित्त देशभरातील बहुतांश राज्यांतील बँक बंद राहतील.

30/06/2024 Image credit: Canva Image credit: Canva

तुम्ही ऑनलाइन बँकिंग सेवेद्वारे सर्व कामे करू शकाल. त्याचसोबत एटीएम सेवाही सुरू असेल. 

30/06/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

या प्राण्याच्या केसांपासून तयार करण्यात आला पहिला टुथब्रश

marathi.ndtv.com