सिनेमे, टीव्ही, आता राजकारण... अरुण गोविल भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात 

Edited by Harshada J S Image credit: Arun Govil Instagram
02/05/2024

अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1952 रोजी मेरठमध्ये झाला. त्यांनी  चौधरी चरण सिंह विद्यापिठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. 

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

कॉलेजच्या दिवसांपासूनच अरुण यांना नाटकांचे वेड होते. तर त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. 

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

1975मध्ये अरुण भावाच्या बिझनेसमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते. पण हे क्षेत्र आपले नाही, अशी जाणीव त्यांना झाली.

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

अरुण यांनी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. 1977 साली त्यांना 'पहेली' सिनेमाद्वारे मोठी संधी मिळाली.

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

1979मध्ये 'सावन को आने दो' व 'सांच को आंच नही' या गाजलेल्या सिनेमांमध्येही अरुण झळकले होते.

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

अरुण गोविल यांनी 1987मध्ये रामानंद सागर यांच्या 'विक्रम वेताळ' कार्यक्रमाद्वारे टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले व 'रामायण' मालिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

युगो साकोच्या इंडो-जपानी अ‍ॅनिमेटेड सिनेमा 'रामायण' द लीजेंड ऑफ प्रिंस राम'(1992) मधील मुख्य पात्रासाठी त्यांनी आवाजही दिला होता.

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

1980मध्ये अरुण गोविल यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला, पण सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी त्यांना कित्येक दशक लागली. 

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

Heading 2

 भाजपने अरुण गोविल यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 

02/05/2024 Image credit: Arun Govil Instagram

आणखी वाचा

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींची राजकीय कारर्कीद

marathi.ndtv.com