अभिनेते झाले नेते! लोकसभेच्या रिंगणातील सेलिब्रिटी
Edited by Rahul Jadhav Image credit: Kangana Ranaut Insta 17/04/2024 रामायणातून सर्वांच्या परिचयाचे असलेले अभिनेते अरूण गोविल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ते मेरठमधून निवडणूक लढवताहेत.
17/04/2024 Image credit: Arun Govil Insta हेमा मालिनी या सलग तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उभ्या राहत आहेत. त्यांना मथुरा लोकसभेतून भाजपने उमेदवारी दिली आहे. विजयाची हॅट्रीक करण्यास त्या उत्सुक आहेत.
17/04/2024 Image credit: Hema Malini Insta लॉकेट चटर्जी या पश्चिम बंगालमधील चित्रपट सृष्टीतलं मोठं नाव आहे. त्यांना भाजपने हुगळी या मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
17/04/2024 Image credit: Locket Chatterjee Insta भोजपुरी नायक आणि गायक म्हणून ओळख असलेले मनोज तिवार पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांचा सामना काँग्रेसच्या कन्हैया कुमार बरोबर होणार आहे.
17/04/2024 Image credit: Manoj Tiwari Insta नवनीत राणा यांना भाजपने उमदेवारी दिली आहे. त्या अमरावती लोकसभेतून रिंगणात आहेत. सलग दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
17/04/2024 Image credit: Navneet Rana Insta पवनसिंह भोजपुरी संगीत क्षेत्रात पवनसिंह यांनी आपली छाप सोडली आहे. ते बिहारच्या काराकाट लोकसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत.
17/04/2024 Image credit: Pawan Singh Insta भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर लोकसभेतून निवडणूक लढवणार आहेत.
17/04/2024 Image credit: Ravi Kishan Insta केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली आहे.
Image credit: Smriti Irani Insta 17/04/2024 बिहारीबाबू म्हणून ओळख असलेले शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालमधून नशीब आजमावत आहेत. त्यांना टीएमसीने आसनसोल मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
Image credit: Shatrughan Sinha Insta 17/04/2024 आपल्या अभिनयाने सर्वांनाच दखल घ्यायला लावणारी अभिनेत्री कंगणा रणौतही लोकसभेच्या मैदनात आहे. ती हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून भाजपची उमेदवारी असेल.
17/04/2024 Image credit: Kangana Ranaut Insta आणखी वाचा
कंगना रणौत एका चित्रपटातून किती कमावते?
Image credit: Kangana Ranaut Insta marathi.ndtv.com