पांढऱ्या केसांच्या समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी खा हे सुपरफुड्स

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Instagram
30/05/2024

डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास केसांना नैसर्गिक काळा रंग मिळू शकतो. पालकमध्ये लोहाचे घटक अधिक असतात. यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहते.

Image credit: Canva
30/05/2024

अक्रोड खाल्ल्याने केसांना बायोटिन मिळते. यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहते व पांढऱ्या केसांची समस्या निर्माण होत नाही. 

30/05/2024 Image credit: Canva

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. आवळा खाल्ल्यास केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होते. स्कॅल्पलाही खूप फायदे मिळतात.

30/05/2024 Image credit: Canva

कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स व व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे केसांची चांगली वाढ होते व पांढऱ्या केसांचीही समस्या दूर होते. 

30/05/2024 Image credit: Canva

अंड्यामध्ये कॅल्शिअम, सेलेनियम व व्हिटॅमिन बी12 हे घटक असतात. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यास मदत मिळते.

30/05/2024 Image credit: Canva

केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहावा, यासाठी डार्क चॉकलेटही खाऊ शकता. डार्क चॉकलेटमध्ये कॉपर असते, ज्यामुळे शरीरामध्ये मेलानिनचे उत्पादन वाढते. 

30/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

30/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

लांबसडक व घनदाट केस हवेत? या 6 फळांचे करा सेवन 

marathi.ndtv.com