LPG Price Hike: सिलिंडरचे दर वाढले, सामान्यांच्या खिशाला कात्री, उज्ज्वला योजनेच्या लाभार्भ्यांचे काय?

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

Image credit: Canva

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं की, वितरण कंपन्यांनी LPGच्या किंमतीत प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ केलीय. 

Image credit: Canva

उज्ज्वला योजनेसह सर्वसामान्य ग्राहकांकरिताही ही दरवाढ लागू असल्याचंही पुरी यांनी स्पष्ट केले.

सामान्य ग्राहकांना आता 14.2 KG वजनाच्या एलपीजी सिलिंडरकरिता 803 रुपयांऐवजी 853 रुपये मोजावे लागतील. 

तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 14.2 KG वजनाचा एलपीजी सिलिंडर आता 503 रुपयांऐवजी 553 रुपयांमध्ये खरेदी करावा लागेल. 

Image credit: Canva

एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. 

Image credit: Canva

दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कावर दोन रुपयांची वाढ केलीय. 

Image credit: Canva

दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्क वाढवण्यात आले असले तरीही या वाढीचा भार ग्राहकांवर पडणार नाही, असे सरकारचे म्हणणंय.

Image credit: Canva

एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कावरील वाढलेल्या किमती 8 एप्रिलपासून लागू होतील.

Image credit: Canva

आणखी वाचा 

नाकामध्ये तेल सोडून झोपल्यास मिळतील इतके मोठे फायदे

marathi.ndtv.com