माघी गणेशोत्सवातील विसर्जनाबाबत मनपाचे भाविकांना मोठे आवाहन
Edited by Harshada J SImage credit: Canva
Image credit: Canva
माघी गणेशोत्सवातील गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीत व्हावे, याकरिता मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या आहेत.
Image credit: Canva
गणेश मूर्तीचे योग्यरित्या विसर्जन व्हावे, यासाठी आवश्यक तेथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे.
Image credit: Canva
पोलीस प्रशासनासह मिळून मूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मार्गाचे नियोजनही करण्यात आले आहे.
Image credit: Canva
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन भाविकांना करण्यात आलंय.
Image credit: Canva
हायकोर्टाचे निर्देश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी भाविकांना महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलंय.
Image credit: Canva
माघी गणेशोत्सवाकरिता महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
Image credit: Canva
स्थानिक सार्वजनिक मंडळे तसेच नागरिकांची मागणी लक्षात घेता या उपाययोजना तसेच सेवा-सुविधांची व्याप्ती देखील वाढवण्यात आलीय.
आणखी वाचा
रणवीर अलाहबादिया प्रकरणात संसदीय समितीची कारवाई, मुंबई पोलीसही पोहोचले घरी