संगमाच्या ठिकाणाचे इतके महत्त्व का? जेथे अचानक झाली चेंगराचेंगरी, मध्यरात्री काय घडले?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यामध्ये बुधवारी (29 जानेवारी 2025) झालेल्या चेंगराचेंगरीमुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Image credit: PTI

अशातच महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी कशी झाली आणि मध्यरात्री नेमके काय घडले? हे जाणून घेणे आवश्यक आहे. 

Image credit: PTI

मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. 

Image credit: PTI

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मौन धारण करुन स्नान-दान केल्यास पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. 

Image credit: AP/ PTI

महाकुंभमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी जवळपास 10 कोटींहून अधिक भाविक स्नान करतील, असा योगी सरकारचा अंदाज होता. 

Image credit: PTI

रिपोर्ट्सनुसार महाकुंभ मेळ्यातील संगमाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी घडल्याचे म्हटलं जातंय. 

Image credit: PTI

यमुना आणि अदृश्य सरस्वतीचे येथे गंगा नदीशी मिलन होते, यावरुनच संगमाचे ठिकाण महत्त्वपूर्ण का ठरते, याचा अंदाज तुम्हाला येईल.

Image credit: PTI

संगमाच्या ठिकाणाचे महत्त्व पाहता प्रशासनाने यंदा महाकुंभ मेळ्यात याचे क्षेत्रफळही वाढवले होते.

Image credit: PTI

दरम्यान मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास येथे अचानक चेंगराचेंगरीची घटना घडली. 

Image credit: PTI

चेंगराचेंगरीमुळे बॅरिकेड्स मोडले आणि काही लोक बेशुद्ध पडले.

Image credit: PTI

बेळगावहून महाकुंभमध्ये आलेल्या विद्या साहू यांनी सांगितले की, आम्ही चालत होतो. तेव्हा मागील बाजूने लोकांनी आम्हाला धक्का द्यायला सुरुवात केली.

Image credit: PTI

विरुद्ध दिशेला एक खांब होता आणि सर्वजण त्याजवळच अडकले : विद्या साहू, भाविक 

Image credit: PTI

दरम्यान दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आणखी वाचा

नागा साधूंवर अंतिम संस्कार कसे आणि कुठे केले जाते?

marathi.ndtv.com