महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

महाकुंभ मेळ्याच्या शेवटच्या दिवशी हर हर महादेव म्हणत भाविकांनी स्नान करण्यास सुरुवात केली. 

Image credit: PTI

दुपारी 2 वाजेपर्यंत 1.18 कोटी भाविकांनी स्नान केल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: PTI

स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांवर मेळा प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. 

Image credit: PTI

पुष्प वर्षावाचे प्रभारी व्ही.के.सिंह यांनी सांगितले की, एकूण 120 क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. 

Image credit: PTI

पहिल्या फेरीत सकाळी 8 वाजता तसेच सर्व घाटांवर सहा वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली, असेही सिंह यांनी सांगितले.

Image credit: PTI

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाशिवरात्रीनिमित्त सोशल मीडियावरून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

Image credit: PTI

आतापर्यंत जवळपास 66 कोटी भाविकांनी  जगाला राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीयत्वाच्या प्रति समर्पणाचा संदेश दिलाय: CM योगी आदित्यनाथ

Image credit: PTI

महाकुंभाच्या शेवटच्या दिवसाच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी CM योगी आदित्यनाथ पहाटे 4 वाजताच नियंत्रण कक्षात पोहोचले होते.

Image credit: PTI

26 फेब्रुवारीचा शेवटचा दिवस आणि महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्ममुहूर्तावरच भाविक स्नानासाठी महाकुंभ मेळ्यात पोहोचले होते. 

Image credit: PTI

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीला शुभारंभ झालेल्या कुंभमेळ्याची सांगता 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. 

आणखी वाचा

रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com