महाकुंभ मेळा 2025 साठी 'या' आहेत शाही स्नानाच्या शुभ तिथी
Edited by Harshada J S
Image credit: PTI
महाकुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात झालीय. प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभ मेळ्याची 26 फेब्रुवारीला सांगता होणार आहे.
Image credit: PTI
महाकुंभ मेळ्याचे दर 12 वर्षांनंतर एकदा आयोजन करण्यात येते. कोट्यवधी भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात.
Image credit: PTI
कुंभ मेळ्यात स्नान केल्याने मोक्ष मिळते, कारण यादरम्यान नद्यांमधील पाणी अमृतासमान असते; असे मानले जाते.
Image credit: PTI
यंदा शाही स्नानासाठी सहा शुभ तिथी आहेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: PTI
13 जानेवारी पौष पौर्णिमेपासून कुंभ मेळ्याचा शुभारंभ झाला. पहिले शाही स्नान याच दिवशी आयोजित करण्यात आले.
Image credit: PTI
दुसरे शाही स्नान 14 जानेवारी 2025ला आहे, सूर्यदेवतेची उपासना आणि नदी स्नान केल्यास पुण्य मिळते, असे म्हणतात.
Image credit: PTI
तिसरे शाही स्नान मौनी अमावस्येला म्हणजेच 29 जानेवारी 2025 ला आहे. या दिवशी स्नान करणे सर्वाधिक लाभदायक मानले जाते.
Image credit: PTI
3 फेब्रुवारी 2025ला वसंत पंचमीच्या दिवशी चौथे शाही स्नान आहे. या दिवशी सरस्वती देवीचे स्मरण, पूजन, स्नान-दान करावे; असे म्हणतात.
Image credit: PTI
12 फेब्रुवारी म्हणजे माघी पौर्णिमेला पाचवे शाही स्नान आहे. या दिवशी स्नान-ध्यान केल्यास इच्छा पूर्ण होतात, असे म्हणतात.
Image credit: PTI
26 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सहावे शाही स्नान आहे आणि यासह महाकुंभ मेळ्याची सांगता करण्यात येईल.
Image credit: ANI
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: PTI
आणखी वाचा
Fastag Rule: चारचाकी वाहनांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडला तर...
marathi.ndtv.com