अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी बंपर भरती, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा 

Edited by Harshada J S Image credit: Aditi Tatkare X
Image credit: ANI

महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे.

Image credit: Aditi Tatkare X

भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केलेय. 

Image credit: PTI

मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविकांची सरळसेवेने 102 म्हणजे 80% पदे तर निवडीद्वारे 272 म्हणजेच 100% पदे भरावयाची आहेत. 

Image credit: Aditi Tatkare X

5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

Image credit: ANI

राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांच्याही भरतीचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Image credit: Aditi Tatkare X

राज्य शासन 75,000 पदभरती करणार आहे, यापैकी 18,000 पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करत असल्याचे तटकरेंनी सांगितले.

Image credit: ANI

14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्यसेविका पदाची सरळसेवा आणि निवडीद्वारे 374 पदभरतीची परीक्षा होणार आहे.

Image credit: Aditi Tatkare X

दरम्यान राज्यातील एकूण 553 विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत 1,10,591 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत.

आणखी वाचा

नवी मुंबई विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

marathi.ndtv.com