कुठे वडिलांविरोधात मुलगी तर कुठे भावाविरोधात भाऊ, या लढतींची कहाणी जबरदस्त इंटरेस्टिंग 

Image credit: X
Image credit: PTI

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. 

Image credit: PTI

महाराष्ट्रात 66.05 टक्के मतदानाची नोंद झालीय, गेल्या 30 वर्षांतील ही सर्वाधिक मतदानाची नोंद असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान या निवडणुकीत कुटुंबातील सदस्यच एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. जाणून घेऊया प्रमुख लढती..

Image credit: ANI
Image credit: Facebook

कन्नड मतदारसंघात हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून निवडणूक लढवताहेत, तर विरोधात त्यांच्या पत्नी आणि शिवसेना उमेदवार संजना जाधव रिंगणात आहेत.

चांदवड मतदारसंघात भाजप उमेदवार राहुल आहेर आणि अपक्ष उमेदवार केदा आहेर हे चुलत भाऊ आहेत. 

Image credit: Facebook

अहेरी मतदारसंघात NCPच्या (अजित पवार) धर्मरावबाबा आत्रामांविरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री NCPकडून (शरद पवार) निवडणूक लढवताहेत. 

Image credit: Facebook

पाचोरा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किशोर पाटील व शिवसेना (उबाठा) उमेदवार वैशाली सुर्यवंशी हे बहीणभाऊ आहेत. 

Image credit: Facebook

बारामतीमध्ये काका अजित पवार यांना पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे.

Image credit: X

बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे आमनेसामने होते. हे दोघे चुलत भाऊ आहे.

Image credit: Facebook

आणखी वाचा

 कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास काय होऊ शकते?

marathi.ndtv.com