धन धना धन धन! कोट्यधीश उमेदवारांची संख्या वाढली

Edited by Harshada J S Image credit: Canva

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी  होणार आहे. 

Image credit: Canva

महाराष्ट्रात 1 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या गेल्या 5 वर्षांत 32 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर गेली आहे. 

Image credit: Canva

शिवसेनेचे (उबाठा) 99% उमेदवारांची संपत्ती ही 1 कोटींपेक्षा जास्त आहे. 

Image credit: Canva

भाजपचे 97 टक्के तर काँग्रेसचे 93 टक्के उमेदवार हे कोट्यधीश आहेत. 

Image credit: Canva

2019 साली 1 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ही महाराष्ट्रातील एकूण उमेदवारांच्या तुलनेत 32%  इतकी होती. 

Image credit: Canva

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच (MEW)ने हा अहवाल प्रसिद्ध केलाय.

Image credit: Canva

महाराष्ट्रातील 412 उमेदवारांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे आहे.

Image credit: Canva

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी 4136 उमेदवार उभे केले आहेत. 

Image credit: Canva

यातील 2201 उमेदवारांच्या माहितीपत्राची पडताळणी केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

Image credit: Canva

महाराष्ट्रातील 58 उमेदवारांनी आपण केवळ साक्षर असल्याचे म्हटले आहे.

Image credit: Canva

1034 उमेदवारांचे शिक्षण हे इयत्ता 5 ते 12वी पर्यंतच झाले असल्याचे दिसून आले आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 मतदानासाठी मोफत वाहन सुविधा कशी मिळेल?

marathi.ndtv.com