माझे कुटुंब,माझी जबाबदारी! तिकीट वाटपात घराणेशाही
Image credit: Canva
मुंबईमध्ये एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. मिलिंद देवरा हे काँग्रेस नेते मुरली देवरांचे पुत्र असून ते वरळीतून निवडणूक लढवताहेत.
Image credit: Milind Deora FB
सुरेश नार्वेकर हे कुलाब्याचे नगरसेवक होते. त्यांचा मुलगा राहुल नार्वेकर हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Image credit: Rahul Narvekar FB
काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांची मुलगी ज्योती गायकवाड या धारावीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
Image credit: Jyoti Gaikwad FB
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवत आहेत. उद्धव यांनीही मुख्यमंत्रिपद भूषवलंय.
Image credit: Aaditya Thackeray FB
भायखळ्याच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव या आमदार असून त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते.
Image credit: Yamini Jadhav FB
राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवत आहेत.
Image credit: Amit Thackeray FB
रमझान अली शेख हे समाजवादी पक्षाचे नगरसेवक होते. त्यांचा मुलगा अस्लम शेख यांना मालाड पश्चिममधून काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आलीय.
Image credit: Aslam Shaikh FB
काँग्रेसचे नेते माजी मंत्री आणि दिवंगत नेते बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकी पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
Image credit: Zeeshan Siddique FB
मालाड पश्चिमेतून भाजपने विनोद शेलारांना उमेदवारी दिलीय. तर आशिष शेलार हे वांद्रे पश्चिमेतून निवडणूक लढवत आहेत.
Image credit: Ashish Shelar FB
समीर देसाई हे शिवसेना (उबाठा) पक्षाकडून गोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामतांचे भाचे आहेत.
Image credit: Sameer Desai FB
सुनील राऊत हे विक्रोळीतून निवडणूक लढवत असून त्यांचे भाऊ संजय राऊत हे शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार आहेत.
Image credit: Sunil Raut FB
अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवताहेत.
Image credit: Sana Malik FB
आणखी वाचा
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अर्ज केला दाखल
marathi.ndtv.com