उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

Edited by Harshada J S Image credit: Ajit Pawar X

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 

Image credit: Ajit Pawar X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (28 ऑक्टोबर) बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

Image credit: Ajit Pawar X

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते पुण्यातील तहसील कार्यालयामध्ये पोहोचले होते. 

Image credit: Ajit Pawar X

अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांनी आपल्या समर्थकांसोबत रॅली काढली आणि मोठे शक्तिप्रदर्शनही केले.

Image credit: Ajit Pawar X

अर्ज दाखल करताना पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित होते. 

Image credit: Ajit Pawar X

बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्या म्हणजे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. 

Image credit: Ajit Pawar X

युगेंद्र पवार यांनी कोणताही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

Image credit: Yugendra Pawar X

युगेंद्र पवार यांच्यासोबत राशपचे प्रमुख शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

Image credit: Yugendra Pawar X

आणखी वाचा

...आणि 3 महिने दिसणं बंद झालं; अ‍ॅक्शन करताना अजय देवगण जखमी

marathi.ndtv.com