पवारांच्या आमदारांनी गुलाबी तर शिंदेंच्या आमदारांनी बांधले केशरी फेटे

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत शनिवारी (7 डिसेंबर) सुरुवात झाली. 

Image credit: PTI

विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली. 

Image credit: PTI

बहुतांश आमदारांनी ईश्वर आणि अल्लाहला साक्षी ठेवून शपथ घेतली. तर काहींनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. 

Image credit: PTI

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महायुतीच्या आमदारांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम' अशा घोषणाबाजी केल्या. 

Image credit: PTI

दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी केशरी रंगाचे फेटे बांधून अधिवेशनास हजेरी लावली. 

Image credit: PTI

तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आमदार गुलाबी रंगाचे फेटे बांधून आले होते.

Image credit: PTI

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांनी गुलाबी रंगाचे जॅकेट-फेटे घालणे सुरू केले होते. 

Image credit: PTI

पक्षाच्या बॅनर आणि पोस्टरवरही त्यांनी गुलाबी रंगाचा वापर केला होता. 

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस शपथविधीपूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी

marathi.ndtv.com