देवेंद्र फडणवीस शपथविधीपूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
शपथविधीपूर्वी फडणवीसांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन पूजा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीचे सरकार स्थापन होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.
फडणवीस, पवार आणि शिंदेंनी 4 डिसेंबरला राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 235 जागा जिंकल्या होत्या.
पण निवडणुकीमध्ये 132 जागा जिंकून भाजपा मोठा पक्ष ठरला आहे.
आणखी वाचा
लग्नाबाबत बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची पहिली प्रतिक्रिया
marathi.ndtv.com