महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरपर्यंत? 

Edited by Harshada J S Image credit: Devendra Fadnavis X 
Image credit: ANI

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. 

Image credit: Devendra Fadnavis X 

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने बुधवारी (11 डिसेंबर) नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. CM फडणवीसही दिल्लीच्या दौऱ्यावर असणार आहेत. 

मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच दिल्लीचा दौरा करत आहेत. 

Image credit: Devendra Fadnavis X 

CM फडणवीस PM मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतील. 

Image credit: Devendra Fadnavis X 
Image credit: Eknath Shinde X

शिवसेनेला गृह खाते आणि महसूल खाते मिळणार नाही, अशी माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने PTIशी बातचित करताना दिली.

महायुतीत तीन पक्षांचा समावेश असल्याने चर्चा लांबणीवर पडत असल्याचंही भाजपच्या नेत्याने सांगितले.

Image credit: Eknath Shinde X

भाजप मुख्यमंत्र्यांसह 21-22 मंत्रिपदं स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. तसेच 4-5 मंत्रिपदे रिक्त ठेवली जाऊ शकतात, असेही ते म्हणाले. 

Image credit: Devendra Fadnavis X 

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीचा दौरा करणार नाहीत.

Image credit: Eknath Shinde X

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह जवळपास 43 मंत्र्यांचा समावेश असू शकतो.   

Image credit: Devendra Fadnavis X 

आणखी वाचा

 कुर्ल्यातील बस अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS

marathi.ndtv.com