दिलजीत दोसांझच्या पुण्यातील कॉन्सर्टमध्ये दारुबंदी?
Edited by Harshada J S Image credit: Diljit Dosanjh Insta
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ त्याच्या 'दिल लुमिनाटी म्युझिक कॉन्सर्ट'मुळे चर्चेत आहे.
Image credit: Diljit Dosanjh Insta
पण पुण्यामध्ये पार पडलेल्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या प्रेक्षकांना कोरडा जल्लोष साजरा करावा लागला.
Image credit: Diljit Dosanjh Insta
कारण महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने दोसांझच्या पुण्यातील कॉन्सर्टमध्ये दारुवर बंदी घातली होती.
Image credit: Diljit Dosanjh Insta
कॉन्सर्ट सुरू होण्यापूर्वी हा निर्णय आल्याने आयोजकांना मोठा झटका बसलाय.
Image credit: Diljit Dosanjh Insta
TOIने दिलेल्या वृत्तानुसार, दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये दारू देण्याच्या परवानगीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रस्ताव मांडण्यात आला होता.
Image credit: Diljit Dosanjh Insta
आयोजकांचा हा प्रस्ताव नाकारत विभागाने कॉन्सर्टमध्ये दारुवर बंदी घातली.
Image credit: Diljit Dosanjh Insta
कोथरूडचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि विभागातील अन्य सदस्यांनीही हे स्थानिक तसेच संस्कृतीविरोधात असल्याचे सांगितले.
Image credit: Diljit Dosanjh Insta
दरम्यान कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने चाहते सहभागी झाले होते आणि त्यांनी दिलजीतच्या गाण्यांचा आनंदही घेतला.
Image credit: Diljit Dosanjh Insta आणखी वाचा
आयुष्यात दारुवर गाणं गाणार नाही, पण... प्रसिद्ध गायकाचे सरकारला आव्हान
marathi.ndtv.com