महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात किती टक्के मतदान झालं?

19/04/2024

19 एप्रिल रोजी देशातील 102 मतदारसंघात मतदान पार पडलं. 

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात मतदान पार पडलं. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, रामटेक या मतदारसंघात शांततेत मतदान पूर्ण झालं. 

सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्व विदर्भात 55 % मतदान पूर्ण झालं. 

3 वाजेपर्यंत 38.43%, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.36 टक्के मतदान झालं.

महाराष्ट्रात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान पार पडलं.

अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथे 73 टक्के मतदान झालं.

आणखी वाचा

UPSC ची परीक्षा आणि त्यासंबंधित नियम

marathi.ndtv.com